भारतीय कर्णधार आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) म्हणतो की, टी-20 विश्वचषकातील भारताच्या कामगिरीने तो निराश आहे, पण संघाला पुढे जाण्याची गरज आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिकला भारताचा कर्णधार बनवण्यात आले आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी हार्दिक म्हणाला की, टीम इंडियाला (Team India) आपला पराभव यश म्हणून घेण्याची गरज आहे. हार्दिकने सांगितले की, आम्ही व्यावसायिक खेळाडू आहोत आणि या पराभवाची जशी आम्ही आमची यशस्विता घेतो त्याच पद्धतीने हा पराभव स्वीकारण्याची गरज आहे. हे मान्य करून पुढे जायला हवे.
संपूर्ण लक्ष न्यूझीलंड दौऱ्यावर
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी, हार्दिक म्हणाला की 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचा रोडमॅप सुरू झाला आहे, परंतु सध्या संघाचे संपूर्ण लक्ष न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. गेल्या काही वर्षात न्यूझीलंड हा एक चांगला संघ असल्याचे तो म्हणाला. "त्यांनी नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि एक संघ म्हणून तुम्हाला आव्हान दिले आहे,". हार्दिक म्हणाला की, या मालिकेत युवा खेळाडूंना संघात आपली योग्यता सिद्ध करण्याची आणि चांगली कामगिरी करण्याची उत्तम संधी मिळेल.
टीम इंडिया बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन येथे स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 ते 5 या वेळेत सराव करेल. न्यूझीलंड दौऱ्यात भारताला 18 ते 30 नोव्हेंबर दरम्यान तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय मालिका खेळायची आहे. (हे देखील वाचा: IND vs NZ T20 2022: हार्दिक-विल्यमसनने क्रोकोडाइल बाइकची केली सवारी, टी-20 मालिकेपुर्वी दोघांनी केली चर्चा (Watch Video)
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय टी-20 संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.