Sourav Ganguly (Photo Credit - Twitter)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) निवर्तमान प्रमुख सौरव गांगुली (Sourav Ganguly) पुन्हा त्यांच्या राज्य युनिट बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या (CAB) अध्यक्षपदी परतणार आहेत. भारताच्या माजी कर्णधाराने शनिवारी सांगितले की मी बंगाल क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवणार आहे. गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले कारण बोर्डातील कोणीही तीन वर्षांहून अधिक काळ हे पद भूषवलेले नाही. बीसीसीआय अध्यक्ष होण्यापूर्वी ते 2015 ते 2019 दरम्यान चार वर्षे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते.

गांगुली पीटीआयला म्हणाले, "होय, मी बंगाल क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवणार आहे. मी 22 ऑक्टोबरला माझा उमेदवारी अर्ज भरण्याची योजना आखत आहे. मी पाच वर्षे बंगाल क्रिकेट असोसिएशन मध्ये होतो आणि लोढा शिफारशींच्या नियमांनुसार, मी आणखी चार वर्षे या पदावर राहू शकतो. (हे देखील वाचा: Sourav Ganguly: बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर सौरव गांगुली म्हणाले...)

अभिषेक दालमिया यांच्या जागी गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिष याला सर्वोच्च पदासाठी नियुक्त करण्याची चर्चा जोरात सुरू होती. पण माजी भारतीय खेळाडूच्या नामांकनामुळे बरीच समीकरणे बदलतील. गांगुली म्हणाला, "मी 20 ऑक्टोबरला माझ्या पॅनेलचा निर्णय घेईन.