अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी 5.30 वाजता खेळवला जाईल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेचा 177 धावांनी पराभव करत इतिहास रचला आहे. यासह अफगाणिस्तान संघाने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेत मालिकेवर कब्जा केला आहे. (हेही वाचा - ENG vs AUS 2nd ODI Live Toss Update: दुसऱ्या वनडेत नाणेफेचा कौल इंग्लडच्या बाजुने, ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी केले आमंत्रित)
या मालिकेसाठी अफगाणिस्तानची कमान हशमतुल्ला शाहिदीकडे सोपवण्यात आली आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व एडन मार्कराम करत आहे. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत फक्त तीन एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या पैकी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दोन सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानने एक सामना जिंकला आहे.
अफगाणिस्तान संघाने 50 षटकात 4 गडी गमावून 311 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटच्या दोन्ही सलामीवीरांनी 73 धावा फलकावर लावल्या. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 34.2 षटकांत केवळ 134 धावा करून बाद झाला.
हेड टू हेड रेकॉर्ड
आत्तापर्यंत अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात फक्त चार एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या काळात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दोन सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानने दोन सामने जिंकले आहेत. 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या ICC एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 9 गडी राखून विजय मिळवला होता. त्या सामन्यात इम्रान ताहिरने 4 विकेट घेतल्या होत्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 2023 च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात 5 गडी राखून विजय मिळवला. त्या सामन्यात रॅसी व्हॅन डर डुसेनने नाबाद ७६ धावांची शानदार खेळी केली.