Asghar Afghan Gets Engaged for 2nd Time: अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असगर अफगाण (Asghar Afghan) आपल्या आयुष्यात एक नवीन टप्पा सुरू करण्यास सज्ज आहे. काबुलचा (Kabul) असून मधल्या फळीतील फलंदाजाचे दुसऱ्यांदा साखरपुडा झाला. अफगाणचे त्याचे दुसरे लग्न असेल आणि त्याला पहिल्या पत्नीपासून आधीच पाच मुलं आहेत. असगर हा अफगाणिस्तानचा (Afghanistan) सर्वात यशस्वी कर्णधार असून तीनही स्वरूपात फलंदाज म्हणून सभ्य कामगिरी केली आहे. 2009 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध पदार्पण केल्यापासून असगरने 111 एकदिवसीय सामन्यात 2356 धावा आणि 69 आंतराष्ट्रीय टी-20 मध्ये 1248 धावा केल्या आहेत. कारकीर्दीत खेळलेल्या 4 कसोटी सामन्यांमध्येही असगरने 249 धावा फटकावल्या आहेत. ही मोठी बातमी सांगत अफगाणिस्तानातल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने ट्विट केले आहे. “अफगाणिस्तानचा राष्ट्रीय कर्णधार असगर अफगाणचा आपल्या आयुष्यात दुसऱ्यांदा साखरपुडा झाला. त्याला पहिल्या पत्नीपासून एका मुलासह पाच मुले आहेत. दुसर्या डावासाठी अभिनंदन कर्णधार.” (ZIM विरुद्ध वहाब रियाझने कोरोनाचा मोडला नियम, चेंडूवर लाळ लावल्यावर मैदानावर उडाला गोंधळ)
अफगाणिस्तान क्रिकेटने आजपर्यंत पाहिलेला एक सर्वोत्कृष्ट नेता म्हणून अफगाण यांना मानले जाते. त्याने फेब्रुवारी 2015 मध्ये मोहम्मद नबीकडून संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी स्वीकारली होती आणि त्यानंतर क्रिकेटपटूकडे मागे वळून पाहिले नाही. त्याने 56 एकदिवसीय सामन्यांमध्ये राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले ज्यातील 21 सामने त्यांनी गमावले तर त्यापैकी 36 सामने जिंकले आहेत. 2018 मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेतही त्यांनी भारताविरूद्ध खेळ बरोबरीत रोखला होता. तथापि, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) आयसीसी विश्वचषक 2019 च्या अवघ्या दोन महिन्यांपूर्वी एप्रिलमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट टीमच्या कर्णधापदावरून कडून टाकले.
Afghanistan national captain @MAsgharAfghan got engaged for the second time in his life.
He has five childrens include a son from his first wife.
Congratulations 👏🎉❣️ for the second inning skipper. pic.twitter.com/tYFQiDw5vO
— M.ibrahim Momand (@IbrahimReporter) November 11, 2020
अफगाणिस्तानची वर्ल्ड कप स्पर्धेतील मोहीम निराशाजनक राहिली आणि लीगमध्ये सर्व नऊ सामने गमावून गुणतालिकेत अंतिम स्थानी राहिले. अफगाणनंतर गुलबदीन नायबने टीमचे 13 संयत नेतृत्व केले ज्यातील संघाला 10 सामन्यात पराभव तर फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यानंतर बोर्डने तीनही फॉर्मेटमध्ये फिरकीपटू स्पिनर राशिद खानला कर्णधारपद सोपवले आणि अफगाणला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले. तथापि, डिसेंबर 2019 मध्ये, एसीबीने गोष्टी सुधारण्याचा निर्णय घेतला आणि सर्व फॉर्मेटमध्ये संघाचे नेतृत्व करण्यासाठी असगरची निवड केली.