Afghanistan National Cricket Team vs South Africa National Cricket Team 1st ODI 2024 1st Innings Scorecard: अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ पहिला एकदिवसीय सामना 18 सप्टेंबर (बुधवार) रोजी शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. आज खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 33.3 षटकांत 106 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने 26 षटकांत 107 धावा करून विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तानने प्रथमच दक्षिण आफ्रिकेला एकदिवसीय सामन्यात पराभूत करून इतिहास रचला आहे. (हेही वाचा - AFG vs SA 1st ODI 2024: अफगाणी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 106 धावांवर रोखले; फजल हक फारुकीने घेतल्या 4 बळी)
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांची सुरुवात खूपच खराब झाली. संघाचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. केवळ विएन मुल्डरने 84 चेंडूत 52 धावा केल्या. त्याच्याशिवाय फक्त ब्योर्न फॉर्च्युइन (16) आणि टोनी डी झोर्झी (11) दुहेरी आकडा गाठू शकले. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली, ज्यामध्ये फझलहक फारुकीने 4 बळी, अल्लाह गझनफरने 3 बळी, रशीद खानने 2 बळी घेतले, यामुळे दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी पूर्णपणे ढासळली.
अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्याचे स्कोअरकार्ड
History in Sharjah! 🚩#AfghanAtalan have delivered a stellar performance to defeat South Africa for the first time in international cricket and take the 1st match of the ongoing ODI series.
Congratulations to the team and the entire nation! 👏#GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/h3iRwRQiNz
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 18, 2024
107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 106 धावा केल्या. मात्र, गुलबदिन नायब (नाबाद 34) आणि अजमतुल्ला उमरझाई (नाबाद 25) यांच्या दमदार फलंदाजीमुळे संघाला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानने 26 षटकांत 107 धावा करून सामना सहज जिंकला. दक्षिण आफ्रिकेकडून ब्योर्न फॉर्च्युइनने 2 तर लुंगी एनगिडीने 1 बळी घेतला. त्याचबरोबर कर्णधार एडन मार्करामच्या खात्यात 1 बळी गेला आहे.