Afghanistan National Cricket Team vs South Africa National Cricket Team 1st ODI 2024  1st Innings Scorecard:  अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ पहिला एकदिवसीय सामना 18 सप्टेंबर (बुधवार) रोजी शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) खेळला जात आहे. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफगाण गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 106 धावांवर ऑलआऊट झाला. अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला 33.3 षटकांत बाद केले. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. ज्यात फजलहक फारुकीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. (हेही वाचा - : दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय)

नाणेफेक जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांची सुरुवात खूपच खराब झाली. रझा हेंड्रिक्सने 12 चेंडूत 9 धावा केल्या, तर टोनी डी झॉर्झीने 18 चेंडूत 11 धावा केल्या. कर्णधार एडन मार्कराम 5 चेंडूत केवळ 2 धावा करू शकला आणि तो लवकरच बाद झाला. ट्रिस्टन स्टब्स आणि जेसन स्मिथही खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. दक्षिण आफ्रिकेसाठी विएन मुल्डर काही काळ सर्वाधिक धावा करणारा ठरला आणि त्याने 84 चेंडूत 52 धावा केल्या, ज्यात 5 चौकार आणि 1 षटकार होता.

अफगाणिस्तानच्या दमदार गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी 106 धावांवर आटोपली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध फजलहक फारुकीने 4 बळी घेतले, तर अल्लाह गझनफरने 3 आणि राशिद खानने 2 महत्त्वपूर्ण बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनाही कंबर कसावी लागणार आहे.