Abhisekh Sharma New Record: झिम्बाब्वे विरुद्धच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात (IND vs ZIM 2nd T20I) अभिषेक शर्माने (Abhisekh Sharma) स्फोटक कामगिरी करत भारतासाठी शतक झळकावले. अभिषेकच्या कारकिर्दीतील हा दुसरा टी-20 सामना आहे. हरारेमध्ये त्याने आपल्या स्फोटक खेळीने अनेक विक्रम मोडीत काढले. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीला आला. यावेळी अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल सलामीला आले. गिल अवघ्या 2 धावा करून बाद झाला. पण अभिषेकने चमत्कार केला. त्याने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपून काढले. अभिषेकने 47 चेंडूंचा सामना करत 100 धावा केल्या. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 8 षटकार मारले.
भारतासाठी दुसऱ्या सामन्यात झळकावले पहिले टी-20 शतक
अभिषेकने आपल्या टी-20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावण्यासाठी सर्वात कमी सामने खेळले. या प्रकरणात विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुलसह अनेक दिग्गज मागे राहिले. भारतासाठी सर्वात कमी सामने खेळताना पहिले टी-20 शतक ठोकण्याचा विक्रम दीपक हुडाच्या नावावर होता. तिसऱ्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला. पण अभिषेकने दुसऱ्याच सामन्यात ही कामगिरी केली. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांना कारकिर्दीतील सहाव्या सामन्यात शतके झळकावता आली.
📸 📸 That 💯 Feeling! ✨
Congratulations Abhishek Sharma! 👏 👏
Follow the Match ▶️ https://t.co/yO8XjNpOro#TeamIndia | #ZIMvIND | @IamAbhiSharma4 pic.twitter.com/EWQ8BcDAL3
— BCCI (@BCCI) July 7, 2024
रोहित-विराटसुद्धा करू शकले नाहीत हा पराक्रम
टीम इंडियासाठी दुसऱ्या टी-20 सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम अभिषेकपूर्वी कोणीही करू शकला नव्हता. टीम इंडियाचा दिग्गज कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसुद्धा हे काम करू शकले नाहीत. रोहित सलामीवीर असूनही कारकिर्दीतील दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याला शतक झळकावता आले नाही. (हे देखील वाचा: Jay Shah यांनी केली पुन्हा भविष्यवाणी, म्हणाले- Rohit Sharma च्या नेतृत्वाखाली Champions Trophy आणि WTCही जिंकणार (Watch Video)
भारताचे तिसरे वेगवान शतक
अभिषेक शर्मा आता आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी तिसरे जलद शतक झळकावणारा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी रोहित शर्मा (35), सूर्यकुमार यादव (45) यांनी चेंडूत शतके झळकावली आहेत. 2016 मध्ये केएल राहुलने फक्त 46 चेंडूत शतक झळकावले होते, म्हणजेच अभिषेक आता या बाबतीत संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये केवळ 10 भारतीय खेळाडूंना शतके झळकावता आली आहेत. त्याच्याआधी सुरेश रैना, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, दीपक हुडा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांनी ही कामगिरी केली आहे.
सर्वात तरुण शतकाच्या यादीत अभिषेक
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील सर्वात तरुण शतकवीरांच्या यादीत अभिषेक शर्माही सामील झाला आहे. अभिषेकने वयाच्या 23 वर्षे 307 दिवसात टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. तीन भारतीय खेळाडूंनी त्याच्यापेक्षा कमी वयात शतके ठोकली आहेत. यशस्वी जैस्वालने 2023 मध्ये वयाच्या 21 वर्षे आणि 279 दिवसात नेपाळविरुद्ध शतक झळकावले आणि आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो सर्वात तरुण खेळाडू देखील आहे. त्याच्यानंतर शुभमन गिल (23 वर्षे 146 दिवस) आणि सुरेश रैना (23 वर्षे 156 दिवस) यांनीही अभिषेकपेक्षा कमी वयात टी-20 शतके झळकावली आहेत.
यशस्वी जैस्वाल – 21 वर्षे 279 दिवस
शुभमन गिल - 23 वर्षे 146 दिवस
सुरेश रैना - 23 वर्षे 156 दिवस
अभिषेक शर्मा - 23 वर्षे 307 दिवस