India National Cricket Team vs England National Cricket Team, 5th T20I Match Scorecard Update: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी20 सामना आज म्हणजे 2 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आला. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवण्यात आला. पाचव्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 150 धावांनी पराभव केला. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर होती. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे होते. यात टीम इंडियाकडून सलामीवीर अभिषेक शर्माने (Abhishek Sharma)135 धावांची शानदार खेळी केली. (Sachin Tendulkar On Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या स्फोटक खेळीने सचिन तेंडुलकरचे जिंकले मन, मास्टर ब्लास्टरने खास व्हिडिओ केला शेअर)
त्याआधी पाचव्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शर्माने 54 चेंडूत 7 चौकार आणि 13 षटकार मारले. त्याने स्फोटक फलंदाजी केली आणि फक्त 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसरे सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला. यानंतर त्याने आपले शतक पूर्ण केले. 11 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फक्त 37 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अशाप्रकारे, अभिषेक शर्मा रोहित शर्मानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. रोहित शर्माने 35 चेंडूत शतक झळकावले. अभिषेक शर्मा फक्त 3 चेंडूंनी रोहित शर्माचा सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम मोडू शकला नाही.
आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज
13 षटकार - अभिषेक शर्मा विरुद्ध इंग्लंड, वानखेडे 2025
10 षटकार – रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, इंदूर 2017
10 षटकार – संजू सॅमसन विरुद्ध दक्षिण आफ्रिका, डर्बन 2024
10 षटकार – तिलक वर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग 2024
रोहित शर्माचा विक्रम मोडला
शतक पूर्ण केल्यानंतर, एका टोकाकडून विकेट पडू लागल्याने अभिषेक शर्माची धावगती थोडी मंदावला. यानंतरही अभिषेक शर्मा 54 चेंडूत 135 धावा करण्यात यशस्वी झाला. अभिषेक शर्माने त्याच्या वादळी शतकी खेळीत फक्त 7 चौकार आणि 13 षटकार मारले. अशाप्रकारे, अभिषेक शर्मा आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला. या प्रकरणात, अभिषेक शर्माने रोहित शर्माचा 8 वर्ष जुना विक्रम मोडला. 2017 मध्ये इंदूर येथे श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहित शर्माने त्याच्या डावात 10 षटकार मारले होते.