आकाश चोपडा (Photo Credit: Instagram)

माजी भारतीय सलामीवीर आकाश चोपडा (Aakash Chopra) यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या दशकातील सर्वोत्तम कसोटी (Test XI of Decade) संघ निवडला आहे. विशेष म्हणजे यामध्ये चोपडा यांनी फक्त दोन टीम इंडिया सदस्यांचा समावेश केला आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांनी काल्पनिक इलेव्हनमध्ये स्थान मिळवले आहे. सर अ‍ॅलिस्टर कुकची पहिला ओपनर म्हणून निवड केली आणि खेळातील एक महान म्हणून संबोधले. या दशकात कूकने 44.8 च्या सरासरीने 7531 धावा केल्या आहेत आणि या दशकात त्याने 18 शतके ठोकली आहेत. हाशिम आमलाने डेविड वॉर्नरला मागे टाकत चोपडा यांच्या दशकाच्या नामांकित कसोटी संघात दुसरा सलामी फलंदाज म्हणून स्थान मिळवले. आमलाने 46 च्या सरासरीने 5446 धावा केल्या आणि 16 शतके ठोकली आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या उल्लेखनीय विक्रमाचा विचार करता चोपडा यांनी जो रूटच्या पुढे स्टीव्ह स्मिथची निवड केली तर चौथ्या स्थानावर विराटचा समावेश आहे. त्याने 53 च्या सरासरीने 7240 धावा केल्या आहेत आणि स्मिथपेक्षा आणखी एक , 27 शतके ठोकली आहेत. अंतिम तज्ज्ञ फलंदाजाची जागा चोपडा यांनी केन विल्यमसनला दिली. कुमार संगकारा श्रीलंकेच्या दशकाच्या उत्तरार्धात जरी खेळला नसला तरी आकाश यांनी त्यांची विकेटकीपर-फलंदाज म्हणून निवड केली. बेन स्टोक्सने संघात अष्टपैलूची जागा मिळवली. आकाशने नॅथन लायनच्या पुढे त्याच्या कसोटी संघातील ऑफ स्पिनर म्हणून अश्विनला निवडले. रंगना हेराथ, डेल स्टेन आणि जेम्स अँडरसन हे अन्य गोलंदाज आहेत.

पाहा आकाश चोपडा यांचा दशकातील कसोटी संघः अ‍ॅलिस्टर कुक, हाशिम अमला, स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली, केन विल्यमसन, कुमार संगकारा (विकेटकीपर), बेन स्टोक्स, रविचंद्रन अश्विन, रंगना हेरथ, डेल स्टेन आणि जेम्स अँडरसन.