प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या धक्क्यातून सिनेसृष्टीतील कलाकार आणि त्याचे चाहते सावरले नसताना क्रीडाविश्वातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्रिपुरा अंडर-19 महिला क्रिकेट संघात (Tripura U-19 Women's Cricketer) खेळणारी 16 वर्षीय अयांती रियांग (Ayanti Reang) हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अयांती हिने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. आयएएनएसने याबाबत वृत्त दिले आहे. अयांतीच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अयांती ही त्रिपुराची राजधानी असलेल्या अगरतालापासून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या उदयपूर येथे राहत होती. अयांती ही चार भावंडांमध्ये सर्वात लहान होती. तिने गेल्या वर्षी त्रिपुराच्या अंडर-19 संघात स्थान मिळवले होते. तिने राज्यस्तरीय 23 वर्षाखालील टी-20 स्पर्धेतही संघाचे प्रतिधित्व केले होते. मात्र, मंगळवारी अचानक तिच्या खोलीत तिचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. ज्यामुळे तिच्या नातेवाईकांसह क्रीडाविश्वातील अनेकांना चांगलाच धक्का बसला आहे. तिने आत्महत्या का केली? याचे कारणही अद्याप समजू शकलेले नाही. हे देखील वाचा- Father's Day 2020: 'बाप एक नंबरी बेटा दस नंबरी'! एम एस धोनी याची झिवा, रोहित शर्माची समायरा यांच्यासह 'या' 5 क्रिकेटपटूंची मुलं सोशल मीडियावर वडिलांपेक्षाही लोकप्रिय

आयएएनएसचे ट्विट-

अयांतीच्या आत्महत्यानंतर त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे सचिव तैमीर चंदा यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच अयांतीच्या निधानाची बातमीने सर्वांनाच हादरून सोडले आहे. अयंतीच्या रुपात आम्ही एक चांगली युवा खेळाडू गमावला आहे, अशीही प्रतिक्रिया चंदा यांनी दिली आहे. अयांती राज्य क्रिकेट संघासोबत खेळत होती. त्यावेळी ती तणावाखाली आहे, असे आम्हाला जाणवले नाही. तब्बल 16 दिवस आम्ही एकत्र होतो आणि ती आनंदी होती, असे चंदा म्हणाले आहेत. सध्या तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? असाही प्रश्न सर्वांनाच पडला आहे.