IND v ENG (Photo Credit- X)

India National Cricket Team vs England National Cricket Team:  भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे, त्यातील दुसरा सामना (IND vs ENG 2nd ODI 2025) आज कटकमधील बाराबती स्टेडियमवर (Barabati Stadium, Cuttack) खेळला जात आहे. टीम इंडियाने (Team India) पहिला एकदिवसीय सामना 4 विकेट्सने जिंकला होता आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. टीम इंडिया मालिका जिंकण्याच्या इराद्याने सामन्यात उतरेल तर इंग्लंडचा संघ मालिका बरोबरीत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. अशा परिस्थितीत हा सामना रंजक होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून वरुण चक्रवर्तीचे वनडेमध्ये पदार्पण केले आहे.

हेड टू हेड रेकाॅर्ड (IND vs ENG Head to Head)

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील आतापर्यंतच्या लढतींमध्ये भारतीय संघाने वरचढ कामगिरी केली आहे. टीम इंडियाने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध एकूण 108 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात टीम इंडियाने 59 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, इंग्लंड संघाने 44 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. दरम्यान, 2 सामने बरोबरीत सुटले आणि 3 सामन्यांमध्ये निकाल लागला नाही. घरच्या मैदानावर खेळताना टीम इंडियाने इंग्लंडला 35 एकदिवसीय सामन्यांमध्ये हरवले आहे आणि 17 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

हे देखील वाचा: IND vs ENG 2nd ODI 2025: विराट कोहलीला कटकमध्ये मोठा विक्रम रचण्याची संधी, अशी कामगिरी करणारा ठरु शकतो तिसरा फलंदाज

आजच्या सामन्यात होऊ शकतात हे मोठे विक्रम

टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14,000 धावा पूर्ण करण्यासाठी 94 धावांची आवश्यकता आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,000 धावा पूर्ण करण्यासाठी 132 धावांची आवश्यकता आहे.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला 200 एकदिवसीय विकेट्स पूर्ण करण्यासाठी चार विकेट्सची आवश्यकता आहे.

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500 धावा पूर्ण करण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे.

टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500 धावा पूर्ण करण्यासाठी 85 धावांची आवश्यकता आहे.

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण करण्यासाठी पाच विकेट्सची आवश्यकता आहे.

इंग्लंडचा स्टार गोलंदाज आदिल रशीदला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 2 विकेट्सची आवश्यकता आहे.