
इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या (IPL 2023) सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघ (CSK vs RR) आमनेसामने असतील. या दोन्ही संघांनी या हंगामात प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत. या संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. दोन्ही संघ चांगल्या लयीत दिसत आहेत. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये आज होणारा हा सामना रोमांचक होऊ शकतो. या मोसमात सीएसकेला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. गुजरात टायटन्सने सीएसकेचा 5 गडी राखून पराभव केला. यानंतर सीएसकेने शानदार पुनरागमन करत दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 12 धावांनी तर मुंबई इंडियन्सचा 7 गडी राखून पराभव केला. गेल्या दोन सामन्यांत हा संघ बलाढय़ दिसत आहे. (हे देखील वाचा: Rohit Sharma ने या बाबतीत MS Dhoni ला मागे टाकत 19व्यांदा पटकावले 'हे' विजेतेपद)
सर्वांच्या नजरा असतील या खेळाडूंवर
ऋतुराज गायकवाड
ऋतुराज गायकवाड सीएसकेचा सलामीवीर आहे. ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत 3 सामन्यात 189 धावा केल्या आहेत. यादरम्यान ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत 2 अर्धशतके झळकावली आहेत. या सामन्यातही तो मोठी धावसंख्या करू शकतो.
अजिंक्य रहाणे
अजिंक्य रहाणे हा अतिशय अनुभवी सलामीवीर आहे. या मोसमातील पहिला सामना खेळताना अजिंक्य रहाणेने 61 धावांची उत्कृष्ट खेळी केली. या सामन्यातही तो चांगली कामगिरी करू शकतो.
मोईन अली
इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने या मोसमात आतापर्यंत 52 धावा केल्या आहेत आणि 4 बळी घेतले आहेत. या सामन्यात तो खेळला तर मोईन अलीच विरोधी संघाच्या गोलंदाजांना घाम फोडायला पुरेसा आहे.
जोस बटलर
आयपीएलच्या 16व्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना जोस बटलरने आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यांमध्ये 152 धावा केल्या आहेत. तो आपल्या संघासाठी आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या सामन्यातही संघाला त्यांच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे.
युझवेंद्र चहल
टीम इंडियाचा दिग्गज गोलंदाज युजवेंद्र चहल हा आयपीएलच्या शेवटच्या हंगामात पर्पल कॅपधारक होता. यावर्षीही चांगली सुरुवात करताना युझवेंद्र चहलने 3 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत. या सामन्यातही तो राजस्थान रॉयल्स संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.
संजू सॅमसन
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने या हंगामात आपल्या संघासाठी आतापर्यंत 3 सामन्यांत 97 धावा केल्या आहेत. या सामन्यातही संजू सॅमसन आपल्या संघाची पहिली पसंती असेल.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
चेन्नई सुपर किंग्ज : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड गायकवाड, अजिंक्य रहाणे, ड्वेन प्रिटोरियस, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार), मिचेल सँटनर, तुषार देशपांडे, सिसांडा मगला.
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, आर अश्विन, वाय चहल, ट्रेंट बोल्ट, जेसन होल्डर, एम अश्विन.