टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या निवृत्तीच्या चर्चा जोर धरत असताना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होता आहे. धोनीचा ट्रेडमार्क 'हेलिकॉप्टर शॉट' (Helicopter Shot) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा शॉट एखाद्या खेळाडूने नव्हे तर 7 वर्षाच्या चिमुकलीने मारला आहे. धोनीच्या या आगळ्या-वेगळ्या फटकेबाजीने संपूर्ण क्रिकेट विश्वाला चकित करून सोडले होते. धोनीनंतर अनेकांनी या शॉटची नक्कल करण्याचा प्रयत्न केला, काहींना यश मिळाले तर काही अजूनही प्रयत्नशील आहेत. अगदी प्रसिद्ध फलंदाजांनाही मारण्यासाठी कठीण दिसत असलेला शॉट ही चिमुरडी अगदी सहजतेने मारत आहे. परी शर्मा (Pari Sharma) असे या 7 वर्षाच्या मुलीचे नाव आहे, जी घरात सरावा दरम्यान हेलिकॉप्टर शॉट लावण्याचा प्रयत्न करीत आहे. परीने मारलेले शॉट पाहून बरेच लोक हैराण झाले. (7 वर्षीय परी शर्मा हिचा फुटवर्क पाहून माइकल वॉन, शाई होप झाले फिदा; पाहा व्हायरल Video)
धोनी एका बॉलरच्या यॉर्करला बॉलवर मारतो त्याप्रमाणे ही मुलगी हा शॉट खेळत आहे. या व्हिडिओला भारतीय महिला फिरकी गोलंदाज पूनम यादवने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये परी, सराव सत्रात धोनीचे प्रसिद्ध ट्रेडमार्क 'हेलिकॉप्टर शॉट' मारण्याचा अभ्यास करत आहे. धोनीच्या या सिग्नेचर शॉटचे ती पूर्ण अनुसरण करीत आहे. या व्हिडिओमध्ये पूनमने स्वतः धोनी, सुरेश रैना आणि बीसीसीआयला टॅग केले. तुम्हीही पाहा हा व्हिडिओ:
This is crazy! 🤯🤯 @msdhoni @ImRaina @BCCI 🚁 pic.twitter.com/lUkq1tReSR
— Poonam Yadav (@poonam_yadav24) June 4, 2020
यापूर्वी देखील परी शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. तिची बॅटिंग आणि फुटवर्क पाहून अनेक दिग्गज क्रिकेटपटूही तिच्यावर खेळावर फिदा झाले. इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन आणि वेस्ट इंडिज क्रिकेटर शाई होप यांनी त्यावेळी परीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.