सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे ज्यात एक 7 वर्षीय मुलगी बॅटिंग प्रॅक्टिस करताना दिसत आहे. परी शर्मा (Pari Sharma), या मुलीचा व्हिडिओ यूजर्सना खूप पसंत पडला आहे. इतकच नाही तर दिग्गज खेळाडू देखील तिची बॅटिंग आणि फुटवर्क पाहून फिदा झाले आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) आणि वेस्ट इंडिज क्रिकेटर शाई होप (Shai Hope) यांनी परीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. वॉनने व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "हा व्हिडिओ पहा, 7 वर्षांची परी शर्मा, काय आश्चर्यकारक मुमेंट आहे." परीचे एक इंस्टाग्राम अकाउंटही आहे ज्यावर तिचे अनेक व्हिडिओ आहेत ज्यात ती दिग्गज फलंदाजा सारखी फलंदाजी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. भारतीय महिला क्रिकेटला अलिकडच्या काळात बरीच प्रसिद्धी मिळवत आहे. या मुलीची फलंदाजी पाहून यूजर्सना मिताली राज, स्मृती मंधाना आणि शैफाली वर्मा यांचीच आठवण आली. (VIDEO: लॉकडाउनमध्ये बाबा एमएस धोनीसोबत जिवाने लुटला बाईक राईडचा आनंद, मम्मी साक्षीने दिली अशी रिअक्शन)
वेस्ट इंडीजचा दिग्गज शाई होपनेही हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, "मी जेव्हा मोठा होइन, तेव्हा मला परी शर्मासारखे व्हायला आवडेल". दुसरीकडे, माजी इंग्लिश कॅप्टन माइकल अर्थटन यांनीही हा व्हिडिओ शेअर केला. पाहा परीचा हा व्हायरल व्हिडिओ:
Timing 👌
Footwork 💪
Shots 🤩
7-year-old Pari Sharma is full of talent! pic.twitter.com/tTy6QDt24l
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 21, 2020
वॉनचे ट्विट
Have a look at this video .. Pari Sharma .. 7 yrs old .. Her movements are as good as it gets 👍👍👏🏻 pic.twitter.com/yeVGd9svKb
— Michael Vaughan (@MichaelVaughan) April 22, 2020
शाई होपची प्रतिक्रिया
When I grow up I want to be like Pari Sharma! 👏🏽👏🏽 https://t.co/7JLFQNc4tR
— Shai Hope (@shaidhope) April 21, 2020
अशा अनेक महिला खेळाडू भारतीय महिला संघात आल्या आहेत, ज्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. 16 वर्षीय शेफाली वर्माने अगदी थोड्याच वेळात भारतीय महिला टीममध्ये स्थान मिळवले आहे. यंदाच्या टी -20 वर्ल्ड कपमध्ये शेफाली भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या सामन्यात ती अपेक्षेप्रमाणे कामगिरी अपयशी ठरली, परंतु संपूर्ण स्पर्धेत आपल्या कामगिरीने तिने निश्चितच सर्वांची मनं जिंकली.