कोरोना व्हायरसच्या संकट काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले असून दक्षिण आफ्रिकामध्ये एक आगळा-वेगळा क्रिकेटचा सामना आज आयोजित केला जाणार आहे. यामध्ये एकाच दिवशी तीन संघांमध्ये सामना क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. प्रिटोरियाच्या (Pritoria) सुपरस्पोर्ट पार्क (SuperSport Park) येथे खेळल्या जाणार्या 36 ओव्हरच्या सामन्यात तीन संघांची स्पर्धा होईल. सरकारने प्रशिक्षण आणि सामना आयोजित करण्यासाठी प्रोटोकॉलला आवश्यक मान्यता न दिल्याने CSAला हा सामना त्याची मूळ तारीख 27 जूनपासून स्थगित करावा लागला. मात्र, सोमवारी सर्व खेळाडूंनी नेट्समध्ये सरावाला सुरुवात केली आणि माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या 102 व्या वाढदिवस दिनानिमित्त हा खेळ रंगणार आहे. सोलिडॅरिटी कपमध्ये (Solidarity Cup) दक्षिण आफ्रिकेच्या 24 प्रमुख क्रिकेटपटू तीन संघात खेळताना दिसतील. ईगल्स, किंगफिशर आणि द काईट- असे या तीन संघांची नावं आहेत. (Coronavirus: 3TC सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका बोर्डाने 6 कोरोना व्हायरसच्या सकारात्मक प्रकरणांची केली पुष्टी, पाहा कोण आहेत कोविड-19 पॉझिटीव्ह)
एबी डिव्हिलियर्स, क्विंटन डी कॉक आणि रेजा हेन्ड्रिक्स, या तीन संघांचे नेतृत्व करतील. दरम्यान, या सामन्यांचे लाइव्ह प्रक्षेपण भारतात देखील उपलब्ध असेल. जाणून घ्या कुठे आणि कसे पाहू शतक तुम्हा निराळा क्रिकेटचा सामना. 3टीक्रिकेट सोलिडॅरिटी कप 2020 शनिवार 18 जुलै रोजी दुपारी 2:00 वाजता स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स 2 एचडी वर पाहिले जाऊ शकते. शिवाय, प्रेक्षक हॉटस्टार अॅप वर या सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.
3TC क्रिकेट सोलिडॅरिटी कप 2020 चे संघ येथे पाहा:
क्विनीचे काईट्स: क्विंटन डी कॉक (कॅप्टन), टेंबा बावुमा, जॉन-जॉन स्मट्स, डेविड मिलर, ड्वेन प्रेटोरियस, लुथो सिपमला, ब्युरान हेंड्रिक्स, एनरिच नॉर्टजे.
केजीचे किंगफिशर्स: हेनरिक क्लॅसेन (captain), रेजा हेन्ड्रिक्स, जनमन मालन, फाफ डु प्लेसिस, थांडो एंटिनी, गेराल्ड कोटजी, ग्लेनटन स्टुर्मन, तबरेज शम्सी.
एबी चे ईगल्स: एबी डिव्हिलियर्स (captain), एडन मार्क्राम, रस्सी वैन डेर ड्यूसेन, काइल वेरिन, एंडिले फेहलुकवेओ, ब्योर्न फोर्टुइन, जुनिअर डाला, लुंगी एनगीडी.