(Photo Credit - Twitter)

Team India Chances To Qualify: T20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी भारतीय (Indian Team) संघ ही स्पर्धा जिंकण्याचा दावेदार होता. पण आधी पाकिस्तान (Pakisthan) आणि आता न्यूझीलंडकडून (New Zealand) पराभव स्वीकारावा लागल्याने भारताची विश्वचषकातील अवस्था बिकट झाली आहे. सेमीफायनलमध्ये भारताचं पोहचणं अवघड असलं तरी अशक्य नक्कीच नाही. भारताचा पुढचा सामना अफगाणिस्थान सोबत आहे. त्यामुळे भारताला काही करुन विश्वचषकात मोठा चमत्कार करन गरजेच आहे. तरच भारताला सेमीफायनलतचे तिकिट मिळू शकेल. (हे ही  वाचा IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: न्यूझीलंडच्या तोफखान्यासमोर टीम इंडिया फलंदाजांची शरणागती, किवी संघासमोर अवघे 111 धावांचे टार्गेट.)

सेमीफायनल मध्ये कसा पोहचेल भारत?

भारताने सलग दोन मॅच गमावल्यामुळे गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर गेला आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये भारताचं पोहोचणं अवघड झालं असलं तरी क्रिकेट हा एक खेळ असल्याने यामध्ये काहीही होऊ शकतं. भारताचे पुढील सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामीबिया या संघाविरुद्ध आहेत. या सामन्यांमध्ये भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवून नेट-रनरेट खूप वाढवावा लागेल. किमान 100 धावांच्या फरकाने सामने जिंकणे भारताला गरजेचे आहे. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर त्यांना आगामी तीन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.

अफगाणिस्थानवर सगळ अवलंबून

टीम इंडियाचा पुढचा सामना आता अफगाणिस्तान विरुद्ध आहे, जर टीम इंडियाने हा सामनाही गमावला तर त्याचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होईल. पण जर टीम इंडियाने तो मोठ्या फरकाने जिंकला आणि नंतर अफगाणिस्तानच्या टीमने न्यूझीलंडला हरवलं तर टीम इंडियाच्या आशा वाढू शकतात. यामुळे टीम इंडियाला नेट-रनरेटच्या मदतीवर सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग खुला होऊ शकतो.