2024 ICC Women’s T20 World Cup Points Table Update: 2024 चा आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 3 ऑक्टोबरपासून (Womens T20 World Cup 2024) सुरू झाला आहे. 10 संघांची महिला क्रिकेट स्पर्धा शारजा आणि दुबई येथे खेळवली जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने कालच्या सामन्यात महिला संघाने पाकिस्तानचा पराभव (Australia Women beat Pakistan Women) केला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे भारतीय महिला संघाच्या अडचणी (Team India) वाढल्या आहेत. टीम इंडियाला आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी आणखी मेहनत करावी लागणार आहे. भारतासाठी उपांत्य फेरीचा आणखी खडतर झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 89 धावांवर गारद झाला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने एक विकेट गमावून 11 व्या षटकात सलग तिसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
टीम इंडिया सध्या अ गटातील गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. ग्रुप स्टेज संपल्यानंतर अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करतील. अशा स्थितीत भारताला आपले स्थान कायम राखावे लागेल. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानावर आहे. टीम इंडियाला आपला शेवटचा गट सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवावा लागेल. याशिवाय नेट रन रेटही चांगला ठेवावा लागेल.
महिला टी 20 विश्वचषक 2024 गुण तालिका
गट अ
क्र. संघ मॅच विजय पराभव टाय नेट रन रेट पॉइंट्स
1 ऑस्ट्रेलिया 3 3 0 0 +2.786 6
२ भारत 3 2 1 0 +0.576 4
३ न्यूझीलंड 2 1 1 0 -0.555 2
४ पाकिस्तान 3 1 2 0 -0.488 2
5 श्रीलंका 3 0 3 0 -2.564 0
गट ब
क्र. संघ मॅच विजय पराभव टाय नेट रन रेट पॉइंट्स
1 इंग्लंड 2 2 0 0 +0.653 4
2 वेस्ट इंडिज 3 2 1 0 +1.708 4
३ द आफ्रिका 3 2 1 0 +1.527 4
४ बांगलादेश 2 1 1 0 -0.125 2
5 स्कॉटलंड 3 0 3 0 -2.671 0
कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार ॲलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संपूर्ण संघाने 19.5 षटकांत केवळ 82 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने अवघ्या 11 षटकांत एक गडी गमावून लक्ष्य गाठले. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानचा नऊ गडी राखून पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.