![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/05/Kapil-Dev-MS-Dhoni-World-Cup-380x214.jpg)
आयसीसी (ICC) आयोजित चार स्पर्धांमध्ये भारतीय संघ (Indian Team) किमान उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला आहे. याखेरीज असे आणखी एक अनोखा विक्रम आहे जे 2011 पासून भारतीय संघाच्या नावे नोंदले गेले आहे. या रेकॉर्डबद्दल जाणून प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला टीमबद्दल अभिमान नक्की वाटेल. वर्ल्ड क्रिकेटच्या इतिहासात भारतीय टीमने 2 वनडे आणि एक टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. भारताने पहिला वनडे वर्ल्ड कप 1983 कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात आणि नंतर 2011 मध्ये एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात जिंकला. त्यापूर्वी भारताने 2007 मध्ये आयोजित करण्यात आलेला पहिला टी-20 वर्ल्ड कपचे विजेतेपद जिंकले. अशा प्रकारे, भारतीय संघ आजवर 60, 50 आणि 20 ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकला आहे आणि असे करणारा तो जगातील एकमेव संघ आहे. 1983 मध्ये देव यांच्या नेतृत्वात भारताने जेव्हा पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला तेव्हा प्रत्येकी 60-60 ओव्हरचे वनडे सामने खेळले जात होते. अशाप्रकारे, जेव्हा भारत पहिल्यांदा विश्वविजेते बनला, तेव्हा या स्पर्धेचे सर्व सामने 60-60 ओव्हरचे खेळले गेले. म्हणजेच भारतीय संघाने प्रथमच 60 षटकांच्या वनडे विश्वचषक जिंकला होता. (एमएस धोनी याने एकाच देशाविरुद्ध झळकावले आहे पहिले टेस्ट आणि वनडे शतक; स्कोअरमध्ये देखील होते साम्य, पाहा हे आकडे)
पहिल्या विश्वचषकात अंतिम सामन्यातदोन वेळाच्या चॅम्पियन्सवेस्ट इंडीजला हरवून भारताने हा पराक्रम केला होता. इंग्लंडच्या लॉर्ड्समधील टीम इंडियाने हे आश्चर्यकारक कामगिरी करत भारतीय क्रिकेटची दिशा बदलली होती. यानंतर भारताला पुन्हा एकदा विश्वविजेता बनण्यासाठी 28 वर्षाची प्रतीक्षा करावी लागली. 2011 मधील वर्ल्ड कप 50 ओव्हरचा खेळला गेला. धोनीच्या नेतृत्वात भारताने श्रीलंकेचा पराभव करत वर्ल्ड कप जेतेपदाची दुष्काळ संपुष्टात आणला होता.
त्यापूर्वी भारताने धोनीच्या नेतृत्वात पहिल्यांदा टी-20 विजेतेपदाचाही मान मिळवला होता. दक्षिण आफ्रिकेत आयोजित या टूर्नामेंटमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून विजय अधिक संस्मरणीय बनवला होता. 60 ओव्हर वर्ल्ड कप सामना अखेरीस 1983 मध्ये खेळला गेला तेव्हा अद्याप हा अनोखा विक्रम अबाधित आहे. मात्र, वेस्ट इंडिजने वनडे वर्ल्ड कप जिंकल्यास ते भारताची बरोबरी करू शकतील, कारण त्यांनी यापूर्वी 60 ओव्हर वर्ल्ड कपचे दोन जेतेपद जिंकले आहेत.