एमएस धोनी याने एकाच देशाविरुद्ध झळकावले आहे पहिले टेस्ट आणि वनडे शतक; स्कोअरमध्ये देखील होते साम्य, पाहा हे आकडे
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने एकाच देशाविरुद्ध पहिले कसोटी आणि वनडे शतक झळकावले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्ही वेळा धोनीने समान धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध धोनीने 123 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 148 धावा केल्या. धोनीच्या कसोटी करिअरमधेही असेच काहीसे घडले.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आज अनेक महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानावरून गायब असला तरी त्याच्या चाहत्यांच्या संख्येत काही कमी झाली नाही. धोनीने प्रत्येक वेळी आपल्या खेळाने मैदान गाजवले आहे. पण तुम्हाला माहित आहे की धोनीने एकाच देशाविरुद्ध पहिले कसोटी आणि वनडे शतक झळकावले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्ही वेळा धोनीने समान धावा केल्या. 23 डिसेंबर 2004 रोजी बांग्लादेशविरुद्ध वनडे शतक ठोकणाऱ्या धोनीने पाचव्या डावात वनडे शतक झळकावले. पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) मालिकेच्या दुसर्या वनडे सामन्यात धोनीने 123 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 148 धावा केल्या. धोनीच्या कसोटी करिअरमधेही असेच काहीसे घडले. धोनीने एक वर्षांपूर्वी म्हणजे 2005 मध्ये टेस्ट डेब्यू केले. (Lockdown: यजुवेंद्र चहल याला सतावतेय एमएस धोनी याची आठवण; अदृश्य होण्याची शक्ती प्राप्त झाल्यास रांचीला जाण्याची इच्छा)
डिसेंबर 2005 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या 'कॅप्टन कूल' धोनीला पहिल्या 4 सामन्यात शतक झळकावले नव्हते. आणि नंतर पाकिस्तानविरुद्ध टेस्ट मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात त्याने शतक ठोकले. या सामन्यात त्याने 153 चेंडूत 19 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 148 धावा केल्या. कसोटी आणि वनडे सामन्याच्या या डावात धोनीने प्रत्येकी 4 षटकार लगावले. अशाप्रकारे धोनीने आपल्या कसोटी आणि वनडे कारकिर्दीच्या पाचव्या सामन्यात 148 धावांचा डाव खेळला आणि दोन्ही वेळा पाकिस्तान संघ समोर होता. पाकिस्तानविरुद्ध धोनीची ही आकडेवारी आश्चर्यकारक आहे.
दरम्यान, धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा अखेरचा सामना 2019 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला. भारताला वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यात किवी टीमकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. या स्पर्धेआधी आणि नंतर धोनी खेळातून निवृत्ती घेईल असे बोलले जात होते, मात्र धोनीकडून अद्याप यावर कोणतेही स्पष्टीकरण केले गेले नाही. क्रिकेटमधून काही काळ ब्रेक नंतर धोनी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मधून मैदानावर पुनरागमन करणार होता, पण कोरोनाचा वाढता प्रभाव आणि लॉकडाउनमध्ये स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली.
(The above story first appeared on LatestLY on May 05, 2020 04:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

