माजी भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने कोरोना व्हायरसने (Coronaviru) ग्रस्त 100 कुटुंबांना दिलेल्या एक लाखांच्या देणगीबद्दल सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. यामुळे त्याची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) खूप चिडली असून तिने यावर एक ट्विटही केले आहे. कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान रोजंदारीवरील मजुरांच्या कुटुंबासाठी धोनीने 1 लाख रुपयांची मदत केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर त्याच्यावर तीव्र टीका करण्यात आली. यावर साक्षीदाराने नाराजी व्यक्त केली आहे. धोनीने पुण्यातील सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट मुकुल माधव फाउंडेशन (Mukul Madhav Foundation), या क्राउडफंडिंग वेबसाइट केट्टोमार्फत 1 लाख रुपयांची देणगी दिल्याचे वृत्त समोर आले होते. रोजंदारी कामगारांना आर्थिक पाठबळ मिळावा म्हणून पुण्यातील मुकुल माधव फाउंडेशन ही संस्था निधी गोळा करत आहेत, आणि त्यांच्या या उपक्रमाला धोनी 1 लक्षांची मदत केल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झालं. या फाउंडेशनद्वारे गरजू कुटुंबांना साबण, डाळी, तांदूळ, आत्ता, तेल, धान्य, डाळी, पोहा, बिस्किटे, चहा, साखर आणि मसाले अशा किराणा आवश्यक वस्तू दिल्या जातील. (Coronavirus Outbreak: एमएस धोनी याची पुण्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना लाख रुपयांची मदत)
धोनीची पत्नी साक्षीने याबाबत सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली होती, असा दावाही करण्यात आला. शिवाय, तिने इतरांनाही दान करण्याचे आवाहन करण्याचं म्हटलं. पण आता या सर्वांवर साक्षीने मौन सोडले आणि हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हणत ते न पासवण्याची विनंती केली. साक्षीने ट्विट केलं आणि म्हणाली की, "मी सर्व पत्रकारांना विनंती करते की अशा संवेदनशील स्थितीत चुकीच्या बातम्या पसरवू नका. असे बेजबाबदार पत्रकारिता कुटून येते, याचे मला आश्चर्य वाटते."
I request all media houses to stop carrying out false news at sensitive times like these ! Shame on You ! I wonder where responsible journalism has disappeared !
— Sakshi Singh 🇮🇳❤️ (@SaakshiSRawat) March 27, 2020
जागतिक महामारीच्या कोरोनामुळे भारत सरकारने 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली असून ते 14 एप्रिलपर्यंत चालेल. परंतु या काळात देशात असे लाखो मजूर आहेत ज्यांची उपजीविका रोजंदारीवर अवलंबून आहे आणि आता लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. अशा लोकांना मदतीसाठी पुण्यातील मुकुल माधव फाऊंडेशन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेला धोनीने एक लाख रुपयांची मदत केल्याचे म्हटले जात होते, त्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आले. अनेकांनी 800 कोटींचा मालक फक्त लाख रुपये दान करतो अशा शब्दात धोनीला धारेवर धरले.