Coronavirus: Lockdown काळात अनुष्का शर्मा बनली पती विराट कोहली ची हेअर स्टायलिस्ट, 'किंग कोहली'ला दिला नवीन लूक, पाहा Video
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Image Credit: Instagram)

लॉकडाऊनमुळे (Lockdown) संपूर्ण देश सध्या घरात राहात आहे जेणेकरून संसर्गाचा प्रसार होण्यापासून रोखता येईल. अशा स्थितीत क्रिकेट टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसुद्धा Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मासमवेत (Anushka Sharma) आपल्या घरीच राहून सहभाग देत आहे. दोघेही चाहत्यांना कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये म्हणून सतत आवाहन करत आहेत. या सर्वांमध्ये अनुष्काने सोशल मीडिया अकाउंट व्हिडिओ शेअर केला आहे जो पाहून आपणही अंदाज लावू शकता की दोघेही सामाजिक अंतराला किती महत्त्व देत आहेत. या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा विराट कोहलीचे केस कापताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात होत असल्याने सध्या सर्वकाही ठप्प झाले आहे. विश्वभरातील सर्व स्पर्धा रद्द झाल्याने सध्या सर्व खेळाडू घर बसले आहेत आणि घरच्यांसोबत दुर्मिळ असा वेळ घालवत आहेत. या महामारीचा सामना करण्यासाठी अनेक खेळाडूंनी पुढाकार घेतला आणि आपल्यापरीने मदत करत आहेत. (Coronavirus Lockdown: विराट कोहली ने लोकांना केले सोशल डिस्टेंसिंग ठेवण्याचे आवाहन, नेटिझन्स म्हणाले 'तू पहिले दान कर')

या रिकाम्यावेळेचा विराट-अनुष्का देखील पूर्ण फायदा करून घेत आहेत. अनुष्का सध्या विराटची हेअर स्टायलिस्ट बनली आहे आणि स्वयंपाकघरातील कात्रीने त्याचे केस कापत आहे. अनुष्काने केलेली हेअर स्टाईल विराटलाही खूप पसंत पडली. आपणही पाहा या दोघांचा हा मजेदार व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

Meanwhile, in quarantine.. 💇🏻‍♂💁🏻‍♀

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या समर्थनार्थ विराट आणि अनुष्काने एक व्हिडिओ बनवून चाहत्यांना लॉकडाऊनच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले. या व्हिडिओमध्ये अनुष्का आणि विराट म्हटले, "कोरोनाविरूद्ध लढाईत विजय मिळविण्यात वेळ लागेल, म्हणून यासाठी धैर्य असणे महत्त्वाचे असल्याचे दोघांनी म्हटले. एका दुर्लक्षामुळे संपूर्ण देशाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. म्हणून आपण ऐक्य दाखवून देश वाचविण्याची गरज आहे. आपलं घर न सोडल्यास आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवू शकतो."