Indian Women Cricket : प्रशिक्षक रमेश पोवार यांचा कार्यकाळ संपला
रमेश पोवार ( फोटो सौजन्य- फेसबुक )

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकापदी रमेश पोवार यांची तीन महिन्यांच्या कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली होती. तसेच भारतीय संघातील खेळाडू मिताली राज हिने तिला संघाबाहेर ठेवल्याने त्यांच्यावर आरोप लावले होते.

भारतीय महिला क्रिकेट संघासाठी बीसीसीआय (BCCI) लवकरच पोवार यांच्या रिक्तपदी नवीन प्रशिक्षकांची नेमणूक करणार आहे. तसेच पोवार यांनी पुन्हा प्रशिक्षक पदासाठी अर्ज केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.  वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 च्या उपांत्य सामन्यामध्ये मिताली राजला बाहेर ठेवण्यात आले होते. त्यामुळे पोवार यांच्या या वागण्यामुळे तिने पोवार यांचा कार्यकाळ संपवावा असा आरोप केला होता.

तसेच पोवार यांच्या आधी तुषार आरोठे यांनी महिला संघाच्या वरिष्ठ खेळाडूसोबत मतभेद झाले होते. त्यानंतर पोवार यांची ऑगस्टमध्ये महिला संघाच्या प्रशिक्षकाचे कार्य सोपविण्यात आले होते.