स्मृती मंधाना (Photo Credit: Twitter/ICC)

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात (Australia Women vs India Women) आज तिरंगी मालिकेतील अंतिम सामना पार पडला. भारतीय महिला क्रिकेट संघाने हा सामना 11 धावांनी गमवला आहे. या मालिकेतील इंग्लंडचा संघ तिसरा असून त्यांना केवळ एकच सामना जिंकला होता. त्यामुळे त्यांना मालिकेबाहेर पडावे लागले होते. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात मेलबर्न येथे अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आस्ट्रेलियाच्या संघाने 20 षटकात 155 धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर 155 धावांचा पाठलाग करत असताना भारतीय संघ 144 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी प्लेयर ऑफ सीरीज तर, जेस जॉनसन हीने प्लेयर ऑफ द मॅचचा मान पटकावला.

भारतीय संघाकडून स्मृती मंधाना हीने उत्कृष्ट कामगिरी बजावली. परंतु, तिची खेळी व्यर्थ ठरली. मंधानाने 37 चेंडूवर 66 धावांची तडाखेबाज खेळी केली होती. यात 12 चोकारांचा समावेश आहे. तर, ऑस्ट्रेलिया संघाच्या विजयात मोलाचे योगदान देणारी स्पिनर जॉनसन हिने 4 षटकात 12 धावा देऊन 5 बळी घेतले. ऑस्ट्रेलियाच्या संघाने दिलेल्या धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेला भारतीय संघाची निराशाजनक सुरुवात झाली. शेफाली शर्मा ही दुसऱ्या षटकात केवळ 11 धावा करून बाद झाली. त्यानंतर मैदानात आलेली ऋचा घोष हिने स्मृती मंधाना हिच्यासोबत 43 धावांची भागेदारी केली. ऋचा घोष आऊट झाल्यानंतर जेमिमा रोड्रिग्ज शुन्यावर बाद झाली. त्यानंतर हरमनप्रीत कौर (14), दिप्ती शर्मा (10), अरुंधती रेड्डी (10), शिखा पांडे (4), राधा पांडे (2), तानिया भाटिया (11) धावा करून बाद झाले. हे देखील वाचा- बारामती: शरद पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमवर होणाऱ्या रणजी सामन्यांचे उद्घाटन; आज भिडणार महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड संघ

ट्वीट-

नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आस्ट्रेलिया संघाचीही सुरुवात खराब झाली होती. दिप्ती शर्माने एलिसा हिलीला 4 धावांवर बाद केले होते. हिली बाद झाल्यानंतर बेथ मूनी आणि इश्ले गार्डनरने 52 धावांची भागेदारी केली. दरम्यान, बेथ मूनी 71 धावांवर नाबाद राहिली. यात 9 चौकारांचा समावेश आहे. गार्डनर आणि कर्णधार मेग लेनिंगने 26-26 धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून राजेश्वरी गायकवाड आणि दिप्ती हिने प्रत्येकी 2-2 विकेट घेतले. तसेच राधा आणि अरुंधतीला 1-1 विकेट मिळाली.