ICC T20 Worldcup 2021: आयसीसी टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, 'या' खेळाडूंना मिळाली संधी
Team Australia (Pic Credit - Cricket Australia Twitter)

आयसीसी टी20 (ICC T20) विश्वचषक 2021 (Worldcup 2021) साठी संघांची तयारी सुरू झाली आहे. न्यूझीलंडनंतर (New Zealand) आता ऑस्ट्रेलियानेही (Australia) आपला संघ (Team) जाहीर केला आहे. एॅरॉन फिंचच्या (Aaron Finch) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ (Team Australia) टी20 विश्वचषकात भाग घेईल. यासह, स्मिथ, वॉर्नर, कमिन्स, मॅक्सवेल आणि स्टोइनिससारखे मोठे चेहरे टीमध्ये परतले आहेत. यूएईमध्ये (UAE) होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. स्मिथ आणि फिंच तंदुरुस्त असल्याने ऑस्ट्रेलियन संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोपरच्या दुखापतीमुळे स्मिथला वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौऱ्याला मुकावे लागले. एवढेच नाही तर, अॅशेस मालिका पाहता स्टीव्ह स्मिथ टी20 विश्वचषकातून बाहेर पडेल असा प्रश्न होता. पण आता स्मिथच्या परतल्याने सर्व प्रश्न संपले आहेत.

फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर पोहोचला. मात्र टी20 मालिके दरम्यान फिंचच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि तो एकदिवसीय मालिका आणि बांगलादेश दौऱ्याबाहेर होता. आरोन फिंच आता पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याला पुन्हा एकदा संघाची कमान देण्यात आली आहे. जोश इंग्लिसच्या रूपाने एका नवीन खेळाडूलाही संघात स्थान मिळाले आहे. तर आयपीएलमध्ये कोटी मिळवणाऱ्या वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनला संधी मिळाली नाही.

मॅक्सवेल, कमिन्स, स्टोइनिस आणि वॉर्नर सारख्या मोठ्या खेळाडूंनी बायो बबलचा हवाला देत वेस्ट इंडीज आणि बांगलादेश दौऱ्यापासून स्वतःला दूर ठेवले होते. या चार खेळाडूंना टी20 विश्वचषकासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. पॅट कमिन्सला संघाचा उपकर्णधारही बनवण्यात आले आहे.सलग पाच टी -20 मालिका गमावलेल्या ऑस्ट्रेलियन संघाच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाचा नवीन मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेलीचा असा विश्वास आहे की या ऑस्ट्रेलियन संघात इतरांना आव्हान देण्याची क्षमता आहेच. परंतू हा संघ विश्वचषक विजेतेपदही जिंकू शकतो.

टी20 विश्वचषकासाठी संघामध्ये आरोन फिंच (कर्णधार), अगर, पॅट कमिन्स (उपकर्णधार), जोश हेजलवूड, जोश इंग्लिश, मिशेल मोर्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्नस स्टोइनिस, स्वॅम्पसन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झांपा, या खेळाडूंची वर्णी लागली आहे. 15 सदस्यांच्या या पथकासह 3 खेळाडूंना राखीव म्हणून घेतले आहे. हे खेळाडू डॅनियल क्रिश्चियन, नॅथन एलिस आणि डॅनियल सॅम आहेत. हेही वाचा Taj Mahal: पर्यटकांना 21 ऑगस्टपासून चांदण्या रात्रीत पाहता येणार ताजमहल, 'अशी' करा तिकिटांची बुकींग

ऑस्ट्रेलियाला विश्वचषकाच्या सुपर 12 टप्प्यातील गट -1 मध्ये स्थान देण्यात आले आहे. जिथे त्याच्यासोबत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज आहे. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्याच दिवशी २३ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या खेळून सुरुवात करेल. संघाचा शेवटचा गट सामना 6 नोव्हेंबरला वेस्ट इंडिजविरुद्ध होईल.