Maharashtra Kesari Kusti 2020 Timetable: पुण्याच्या बालेवाडीत उद्यापासून रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्तीचा आखाडा, पाहा स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक
Kusti Image For Representation (Photo Credits: Instagram)

63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari Kusti) स्पर्धेचे आयोजन यंदा 2 ते 7 जानेवारी दरम्यान पुण्याच्या बालवाडीत होणार आहे. बालेवाडी येथील पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये स्पर्धा आयोजित केली जाईल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अव्वल दर्जाचे नऊशे ते साडेनऊशे मल्ल सहभागी घेतील. राज्य,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरासाठी महाराष्ट्राच्या मातीतील खेळाडू घडवण्यासाठी कुस्तीगीर परिषदेने पुण्यातील सिटी कार्पोरेशन कंपनीशी पाच वर्षांचा करार केला आहे. दरवर्षी प्रमाणे ही स्पर्धा माती आणि गादी या दोन्ही प्रकारात खेळवण्यात येईल. आणि एकूण 10 आणि 20 गटांमध्ये ही स्पर्धा खेळली जाईल. पुणे जिल्ह्याला तब्बल 12 वेळा या स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान मिळाला आहे. 2017 मध्ये झालेल्या स्पर्धेत पुण्यातील भूगावमध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजित कटके याने जेतेपद मिळवले होते. 62 वी स्पर्धा जालन्यात झाली होती आणि बुलढाण्याच्या पैलवान बाला रफिक शेख जेतेपदाची मानकरी ठरला होता. बाला सलग दुसरे जेतेपद जिंकण्याच्या उद्देशाने कुश्तीच्या या रिंगणात उतरेल.

असा आहे 2020 च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे वेळापत्रक, पाहा:

*महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे असे असेल कार्यपत्रिका*

 गुरुवार दिनांक २ जानेवारी 2020

●सकाळी 10 वा- सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांचे आगमन.

●सकाळी 11 ते 1 वा पर्यत - पंच उजळणी वर्ग सत्र१.

●दुपारी 3 ते 5-पंच उजळणी वर्ग सत्र 2.

●सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व शहर व जिल्हा संघांचे आगमन.

● सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत - वैद्यकीय तपासणी वजने अ विभाग (57 व 79 किलो)

■ शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2020

● सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कुस्ती स्पर्धा "अ" विभाग (57 व 79 किलो)

● दुपारी 12 ते 1 वैद्यकीय तपासणी व वजने "ब" विभाग.(61,70 व 86 किलो)

● दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजता-कुस्ती स्पर्धा "अ"व "ब"विभाग.(57, 61, 70, 79 व 86 किलो)

● सायंकाळी 6 वाजता-उद्घाटन समारंभ.

शनिवार दिनांक 4 जानेवारी 2020

● सकाळी 8 ते दुपारी 12 वा कुस्ती स्पर्धा "ब" विभाग..(61,70 व 86 किलो)

●दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत- वैद्यकीय तपासणी व वजने "क" विभाग. (74,92 व महाराष्ट्र केसरी गट)

● दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजता - कुस्ती स्पर्धा "ब"व "क" विभाग . (61, 70, 74, 86, 92 व महाराष्ट्र केसरी गट किलो)

रविवार दिनांक 5 जानेवारी 2020

●सकाळी 8 ते दुपारी 12 वाजता कुस्ती स्पर्धा "क" विभाग. (74,92 व महाराष्ट्र केसरी गट)

◆दुपारी 12 ते 1 वैद्यकीय तपासणी व वजन "ड"विभाग. (65 व 97 किलो वजनी गट)

◆दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजता- कुस्ती स्पर्धा "क" व "ड"विभाग. (65, 94, 92, 97 व म.के गट)

सोमवार दिनांक 6 जानेवारी 2020

● सकाळी 8 ते दुपारी 12 वाजता- कुस्ती स्पर्धा "क" व "ड"विभाग. (65, 74, 92, 97 व म.के गट)

●दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजता कुस्ती स्पर्धा "क" व "ड"विभाग. (65, 74, 92, 97 व म.के गट)

मंगळवार दिनांक 7 जानेवारी 2020

●सकाळी 9 ते 12 वाजता कुस्ती स्पर्धा "ड"विभाग.( 65 व 97 किलो)

● सायंकाळी 5 वाजता "महाराष्ट्र केसरी" किताबाची अंतिम लढत व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ.

यंदा मातीवरील कुश्तीसाठी 2 आणि मॅटवरील कुश्तीसाठी 2 आखाडे बनवण्यात आले आहे. 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 किलो आणि महाराष्ट्र केसरी से एकूण दहा वजनी गट आहे.  यंदाच्या स्पर्धेसाठी 900 ते 950 खेळाडू आणि 125 अंपायर आज बालवाडीत दाखल होतील.