अफगाणिस्तान मधील Fayzabad भागात आज (3 जानेवारी) दिवशी 2 भूकंपाचे धक्के बसले आहेत. अवघ्या अर्धा तासामध्ये दोनदा हा भाग भूकंपाने हादरला आहे. National Centre for Seismology च्या माहितीनुसार, पहिला भूकंप हा रात्री साडे बाराच्या सुमारास 4.4 रिश्टल स्केलचा जाणवला त्यानंतर 30 मिनिटांतच 4.8 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला आहे. दरम्यान या भूकंपामध्ये हादरे जाणवले असले तरीही कोणत्याही वित्तहानीचं, जीवितहानीचं वृत्त समोर आलेले नाही. अफगाणिस्तान मध्ये 12 डिसेंबरला 5.2 रिश्टल स्केलचे धक्के जाणवले आहेत.
Two earthquakes hit Afghanistan in less than half an hour
Read @ANI Story | https://t.co/QfuLu5Aben#Afghanistan #Earthquake pic.twitter.com/LzSlBcmBj1
— ANI Digital (@ani_digital) January 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)