Russian TikToker Dies on Camera: रशियन टिकटॉकर अरिना ग्लाझुनोवाचा ( Arina Glazunova) जॉर्जियाच्या तिबिलिसी येथील सबवे स्टेशनच्या पायऱ्यांवरून खाली पडून मृत्यू झाला आहे. अरिना 27 वर्षांची होती. आपल्या मित्रासोबत व्हिडिओ चित्रित करत असताना ती पडली व त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात झाला तेव्हा ग्लाझुनोवा शहरातून फिरत असताना तिच्या सोशल मीडियासाठी कंटेंट रेकॉर्ड करत होती. रिपोर्ट्सनुसार, व्हिडीओमध्ये तो क्षणही कैद झाला जेव्हा, तिचा तोल गेला आणि ती स्टेशनवर पायऱ्यांवरून खाली पडली. त्यानंतर तिच्या कवटीला फ्रॅक्चर झाले तसेच शरीरावर अनेक जखमा झाल्या. अपघातानंतर लगेचच तिचा मृत्यू झाल्याची पुष्टी स्थानिक अधिकाऱ्यांनी केली. ग्लाझुनोव्हाच्या मृत्यूने तिच्या फोलोअर्सना धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत शोक व्यक्त केला आहे. अरिनाच्या मृत्यूने सार्वजनिक ठिकाणी आजूबाजूला लक्ष न देता चित्रीकरणाच्या धोक्यांबद्दल चिंता वाढवली आहे. (हेही वाचा: Kubra Aykut Dies by Suicide: स्वतःशी लग्न करणाऱ्या 26 वर्षीय तुर्किश टिकटॉक स्टार कुब्रा आयकुटने केली आत्महत्या; 5 व्या मजल्यावरून मारली उडी)
Russian TikToker Dies on Camera-
NEW: Woman falls to her death after tripping over a wall while singing and dancing with a friend
Arina Glazunova’s last moments were captured on video by a friend in Tbilisi, Georgia, on September 27
The 24-year-old from Moscow was singing along to the song “For The Last Time”… pic.twitter.com/4KZ5yzTNdz
— Unlimited L's (@unlimited_ls) October 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)