Kubra Aykut Dies by Suicide: स्वतःशी लग्न करणाऱ्या 26 वर्षीय तुर्किश टिकटॉक स्टार कुब्रा आयकुटने केली आत्महत्या; 5 व्या मजल्यावरून मारली उडी

रिपोर्ट्सनुसार, इस्तंबूलच्या सुल्तानबेली जिल्ह्यात सोमवारी एका लक्झरी अपार्टमेंट इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून तिने आपले जीवन संपवले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

Kubra Aykut Dies by Suicide: स्वतःशी लग्न करणाऱ्या 26 वर्षीय तुर्किश टिकटॉक स्टार कुब्रा आयकुटने केली आत्महत्या; 5 व्या मजल्यावरून मारली उडी
Turkish Influencer Kubra Aykut (Photo Credits: Instagram/ @kubrasalofficial)

Kubra Aykut Dies by Suicide: सोशल मीडिया आता लोकांसाठी त्यांची प्रतिभा दाखवण्याचे, ओळख मिळवण्याचे आणि पैसे कमावण्याचे माध्यम बनले आहे. अनेकजण सोशल मीडियाचा वापर जगासमोर आपली प्रतिभा दाखवण्यासाठी करत आहेत, तर काहीजण आपला संदेश जगाला देण्यासाठी ते वापरत आहेत. सोशल मीडियाने आतापर्यंत अनेकांना यशाची शिखरे गाठण्यास मदत केली आहे. तुर्कियेची स्वतःशी लग्न करणारी प्रसिद्ध टिकटॉक स्टार कुब्रा आयकुटचे (Kubra Aykut) नावही या यादीत समावेश होते. मात्र आता तिने आत्महत्या केली आहे.

रिपोर्ट्सनुसार, इस्तंबूलच्या सुल्तानबेली जिल्ह्यात सोमवारी एका लक्झरी अपार्टमेंट इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून तिने आपले जीवन संपवले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आयकुट हिच्यावर तिच्या मूळ जिल्ह्यातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. टिकटॉक स्टारच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.

कुब्रा तिच्या वेडिंग विदाऊट अ ग्रुम, म्हणजेच स्वतःशी लग्न केल्याने खूप प्रसिद्ध झाली होती. कुब्राच्या या व्हिडिओनंतर तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये मोठी वाढ झाली होती. स्थानिक अधिकाऱ्यांना तिच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडली आहे. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून कुब्रा सोशल मीडियावर सतत काही त्रासदायक पोस्ट शेअर करत होती, ज्याद्वारे ती तिच्या चिंता चाहत्यांसोबत शेअर करत होती. या पोस्ट्समुळे तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यात काही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसते. (हेही वाचा: Chennai Shocker: बाळ वाचल्याचा आनंद पण ट्रोलिंग झाल्याने दु:ख; आईची आत्महत्या, वाचा सविस्तर)

याशिवाय तिने अलीकडेच तिच्या वजनाबाबत एक पोस्टही शेअर केली होती. कुब्रा तिच्या कमी वजनामुळे खूप नाराज होती. तिने तिच्या सतत कमी होत असलेल्या वजनाबाबत एक पोस्ट देखील शेअर केली होती. कुब्रा आयकुटने तिच्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिले होते- 'मी माझी सर्व शक्ती वापरली आहे, परंतु तरीही माझे वजन वाढत नाही. माझे वजन दिवसेंदिवस कमी होत आहे. मला आता काय करावे हे समजत नाही.

(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2024 12:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).