मुंबईत कोसळत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी देलेल्या माहितीनुसार, अंधेरी सबवे येथे पाणी साचल्याने दक्षिण उत्तर दोन्ही वाहिनीवरील वाहतूक बंद केली आहे. तर दुसऱ्या एका ठिकाणी कारच्या बिघाडामुळे पोल क्रमांक 271 ईस्टर्न फ्रीवे उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

अंधेरी सबवेवर पाणी

शहरातील विविध ठिकाणी सकल भागात पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना पाण्यातून मार्ग काढताना दमछाक करावी लागत आहे. दरम्यान, शहर वाहतूक पोलीस नागरिकांसाठी मदत आणि मार्गदर्शन करत आहेत.

इस्टर्न फ्री वेवर उत्तरेकडे वाहतूक मंदावली

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)