सध्या महाराष्ट्रात जवळजवळ सगळीकडेच मुसळधार पाऊस सुरु आहे. मंगळवारी पुणे शहरालाही पावसाने झोडपले. शहरात मंगळवारी झालेल्या पावसाने हाहाकार उडवला असून, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अवघ्या एका तासाच्या पावसाने विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या बाहेरच्या मार्गांवर आणि प्रवेशद्वारांवर पाणी तुंबले, ज्यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. विमानतळावरील ड्रेनेज व्यवस्थेची कमतरता या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आली आहे. पुणे विमानतळावर यापूर्वीही पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत, परंतु नव्या टर्मिनलच्या उद्घाटनानंतरही ही समस्या कायम राहिल्याने प्रशासनावर टीका होत आहे.

विमान नगरमधील विमानतळाकडे जाणारे रस्तेही पाण्याखाली गेले होते. पाणी साचल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विमाननगर, कल्याणीनगर आणि खराडी यांसारख्या भागांतही रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी झाली. भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले की, विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह असणारा हा पाऊस 25 मे पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट भागात पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी आहे. (हेही वाचा: Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश)

Waterlogging at Pune Airport:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)