गाझा येथील शरणार्थी शिबिरावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 47 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. या विधानानुसार इस्रायलने उत्तर गाझा पट्टीवर असलेल्या निर्वासितांच्या शिबिरावर बॉम्बफेक केली आहे. यामध्ये 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सहा हवाई बॉम्बचा वापर करून कॅम्पमधील एक संपूर्ण निवासी भाग उद्ध्वस्त केला. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दावा केला आहे की जबलिया निर्वासित शिबिरावरील हल्ले हा इस्त्रायलचा आतापर्यंतचा प्रदेशावरील सर्वात मोठा हल्ला आहे. याआधी मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलने या प्रदेशावर आक्रमण सुरू केल्यापासून गाझामध्ये 8,525 लोक मारले गेले आहेत. (हेही वाचा: Shani Louk Confirmed Dead: हमासच्या हल्ल्यादरम्यान अपहरण करून नग्न परेड केलेल्या जर्मन टॅटू आर्टिस्टचा मृत्यू; बहिणीने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये केली पुष्टी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)