इस्रायलवरील हल्ल्यादरम्यान 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या सैनिकांनी अपहरण करून नग्न परेड केलेल्या 22 वर्षीय जर्मन नागरिक शनी लुकचा (Shani Louk) मृतदेह सापडला आहे. लुकची बहीण, आदि (Adi) हिने सोमवारी, 30 ऑक्टोबर रोजी इंस्टाग्रामवर तिच्या मृत्यूची पुष्टी केली. हल्ल्याच्या दिवशी एक व्हिडिओ प्रसारित केला गेला होता, ज्यामध्ये दिसत होते की लुकला अपहरण करून नग्नावस्थेत पिकअप ट्रकमधून गाझा येथे नेण्यात येत आहे. ती अजूनही जिवंत आहे की नाही हे त्या फुटेजमधून समोर आले नव्हते. या व्हिडिओनंतर लुकच्या आईने नंतर पुष्टी केली होती की त्यांची मुलगी जिवंत आहे आणि गाझा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र आता शनी लुकचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तिचा मृतदेह गाझामध्ये इस्रायली सैन्याला सापडला आहे. तिचे कुटुंब आणि इस्रायल सरकारने आज याची पुष्टी केली. शनी ही पेशाने टॅटू आर्टिस्ट होती. ती एका संगीत महोत्सवात सामील होण्यासाठी इस्रायलला आली होती. (हेही वाचा: Israel Hamas Crisis: इस्रायल-हमास युद्धादरम्यान इलॉन मस्कची मोठी घोषणा, स्टारलिंकवरून गाझाला इंटरनेट सेवा प्रदान करणार)
JUST IN - German Hamas hostage: family announces the death of Shani Louk on Instagram — BILD pic.twitter.com/kIqNdCPmdQ
— Disclose.tv (@disclosetv) October 30, 2023
🔴 FLASH - #Allemagne : Otage allemand du #Hamas : la famille annonce la mort de Shani Louk sur Instagram. Shani Louk participait à la fête techno, dans le sud d'Israël, près de la frontière avec Gaza, où des commandos du Hamas ont tué environ 250 personnes. (Src : BILD).… pic.twitter.com/PkGWXJfKpV
— FranceNews24 (@FranceNews24) October 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)