Gaza Ceasefire Deal: हमासने युद्धविराम कराराचा भाग म्हणून चार महिला इस्रायली सैनिकांची सुटका (Hamas Releases Israeli Soldier)केली आहे, त्यांना गाझा (Gaza) शहरातील पॅलेस्टाईन चौकातील रेड क्रॉस अधिकाऱ्यांकडे सोपवले आहे. त्या बदल्यात, इस्रायल त्यांच्या तुरुंगातून 200 पॅलेस्टाईन लोकांना मुक्त करणार (Prisoner Exchange)आहे. शनिवारी पॅलेस्टाईन लोकांच्या मोठ्या जमावासह मुखवटा घातलेल्या हमास आणि इस्लामिक जिहाद सैनिकांच्या मेळाव्यात ही देवाणघेवाण झाली. मुक्त केलेले सैनिक - करिना रिव्ह, डॅनिएला गिल्बोआ, नामा लेव्ही आणि लिरी अल्बाग - इस्रायली लष्करी गणवेशात होत्या. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्याच्या उद्देशाने युद्धविराम अटींनुसार कैद्यांच्या देवाणघेवाणीचा हा दुसरा टप्पा होता.

हमासकडून 4 इस्रायली महिला सैनिकांची सुटका

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)