Pakistan: पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची राजधानी लाहोरमध्ये पोलिसांनी चार विद्यार्थिनींवर गुन्हा दाखल केला आहे. लाहोरमधील एका खासगी कॉलेजमध्ये या चार विद्यार्थिनी एका सहकारी विद्यार्थिनीवर 'ड्रग्स'साठी अत्याचार करत असल्याचा आरोप आहे. आता हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलीस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. लाहोरमधील डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटी (DHA) मध्ये असलेल्या अमेरिकन इंटरनॅशनल स्कूलमध्ये 16 जानेवारी रोजी ही घटना घडली. पीडित विद्यार्थिनीचा शाळेतील वर्गमित्रांकडून छळ होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चार मुली पीडितेचे केस पकडून तिला जमिनीवर आपटत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. एवढेच नाही तर चार मुली पीडितेवर अत्याचार करतात आणि तिला ‘सॉरी’ म्हणण्यास सांगत आहेत. पीडित विद्यार्थिनीचे वडील इम्रान युनूस यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चार मुलींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)