Bangkok Pollution Alert: जगभरात अनेक ठिकाणी प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. प्रदूषणामुळे अनेक ठिकाणी लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या यादीत आता आणखी एका नवीन नावाची भर पडली आहे, ते म्हणजे थायलंडची राजधानी बँकॉक. बँकॉक येथे आजकाल प्रदूषणामुळे वातावरण खूपच खराब झाले आहे. त्यामुळे पुढील काळात जर तुम्ही बँकॉकला भेट देण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा. गुरुवारी बँकॉक आणि आजूबाजूच्या परिसरात प्रदूषणाची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे आणि त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनीही हे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे म्हटले आहे.

प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर, बँकॉकचे गव्हर्नर चाडचार्ट सिट्टीपुंट यांनी शहरातील सर्व कर्मचाऱ्यांना गुरुवार आणि शुक्रवारी घरून काम करण्याचा सल्ला दिला. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी बँकॉक महानगर प्रशासनासह सुमारे 151 कंपन्या, संस्था, सरकारी कार्यालये आणि खाजगी क्षेत्राचे सहकार्य मागितले आहे. बँकॉकच्या 50 जिल्ह्यांपैकी किमान 20 जिल्ह्यांमध्ये हानिकारक पीएम 2.5 कणांची धोकादायक पातळी आहे. बँकॉक जगातील टॉप 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. (हेही वाचा: Cancer Vaccines: रशिया कॅन्सरच्या उपचारासाठी लस बनवण्याच्या अगदी जवळ; President Vladimir Putin यांची माहिती)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)