दक्षिण कोरियामधील लोकप्रिय बँड ASTRO च्या मून बिनचे निधन झाले आहे. व्यावसायिकरित्या मून बिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दक्षिण कोरियन गायक, अभिनेता, डान्सर आणि मॉडेलचे वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी निधन झाले आहे. अहवालानुसार या तरुण के-पॉप स्टारने सोलच्या (Seoul) गंगनम जिल्ह्यातील त्याच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली. मून बिन हा दक्षिण कोरियन बॉय ग्रुप अॅस्ट्रोच्या 5 सदस्यांपैकी एक होता. मून बिनचा जन्म 26 जानेवारी 1998 रोजी चेओंगजू-सी, दक्षिण कोरिया येथे झाला होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (हेही वाचा: टीव्ही प्रसिद्ध अभिनेते केके गोस्वामीच्या चालत्या कारला आग, मोठा अपघात टळला)
ASTRO’s Moonbin has passed away at the age of 25. pic.twitter.com/Qvt4oE0H7w
— Pop Base (@PopBase) April 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)