BangladeshFire: बांगलादेशची राजधानी ढाका येथील बेली रोडवर सात मजली इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना गुरुवारी रात्री घडली आहे.इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली आणि क्षणातच ही आग वर पर्यंत  पसरली. या भीषण आगीत 44 लोकांचा मृत्यू झाला आणइ 20 हून अधिक जण जखमी झाले आहे अशी माहिती ढाका ट्रिब्यूनने दिले आहेत. आग विझवण्याचे शर्तीचे काम सुरु आहेत. घटनास्थळी शहरातील प्रशासन व्यवस्था दाखल झाली आहे. एका अधिकाऱ्यांने सांगितल्याप्रमाणे, आगीत 65 लोक अडकले होते. त्यापैकी 42 लोक बेशुध्द झाले. घटनास्थळी 13 अग्निशमन दलाच्या गाड्या हजर झाल्या आहेत. आरोग्य मंत्री डॉ. सामंन लाल सेन यांनी सांगितले की, ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये 33 लोकांचा मृत्यू झाला आहे. आणखी दोन रुग्णालयात लोकांवर उपचार सुरु आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)