भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्रोने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र, त्याला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ चंद्राच्या शिवशक्ती बिंदूवरून सिग्नल मिळण्याची वाट पाहत आहेत. शनिवार या दिशेने महत्त्वाचा ठरू शकतो. काही काळापूर्वी केलेल्या एका पोस्टमध्ये, भारतीय अंतराळ संस्थेने म्हटले आहे की, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संवाद स्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे जेणेकरून त्यांच्या जागृत स्थितीची माहिती मिळू शकेल.

23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 च्या 'विक्रम' लँडरच्या सॉफ्ट लँडिंगनंतर भारताने इतिहास रचला होता. चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचणारा भारत हा चौथा आणि दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला आहे. चंद्राच्या ज्या भागात विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर आहेत तेथे अनेक दिवस रात्र असल्याने त्यांना स्लीप मोडवर पाठवण्यात आले होते. मात्र आता चंद्रावर पुन्हा सुर्योदय होणार असल्याने रोवर आणि लँडर पुन्हा सक्रीय करण्याचे इस्रोचे प्रयत्न आहेत. (हेही वाचा: Chandrayaan 3 Mission Update: चंद्रावर सूर्योदय, Vikram lander आणि Pragyan rover पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)