भारतविरोधी कारवायांसाठी खलिस्तानी दहशतवाद्यांना आपल्या भूमीवर आश्रय देणाऱ्या कॅनडासोबत भारताच्या सुरू असलेल्या वादाचा परिणाम आता दिसू लागला आहे. नुकतेच कॅनेडियन गायक आणि रॅपर शुभ उर्फ ​​शुभनीत सिंगचा आगामी भारत दौरा रद्द करण्यात आला आहे. तसेच स्पीकर कंपनी बोटने शुभचे आपले प्रायोजकत्व रद्द केले आहे. त्यानंतर आता माहिती मिळत आहे की, शेअरचॅट (ShareChat) च्या मालकीच्या मोजने (Moj) आपल्या संगीत लायब्ररीतून कॅनेडियन गायक शुभची गाणी काढून टाकली आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून शुभच्या भारत भेटीला विरोध होत होता. शुभला त्याच्या जुन्या भारतविरोधी पोस्टसाठी भारतात एवढ्या विरोधाला सामोरे जावे लागले. शुभने खलिस्तानींना पाठिंबा देणारा भारताचा विकृत नकाशा शेअर केला होता. या नकाशात जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारत भारताच्या नकाशात दाखवण्यात आलेला नव्हता. (हेही वाचा: Shubh's India Tour Cancelled: भारतीय कॅनेडीयन गायक 'शुभ' चा भारत दौरा रद्द; Book My Show रिफंड करणार तिकीटाचे पैसे)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)