विविध इंस्टाग्राम अकाउंट अचानक हॅक झाल्याने अनेक नेटकरी सध्या ट्वीटरवर व्यक्त होताना दिसत आहे. तसेच काहींचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. आज दुपारी साडेबारा नंतर इंस्टाग्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतांना दिसत आहे. इंस्टाग्रामबाबत जागतिक आउटेज साइट डाउन डिटेक्टरवर 3,000 हून अधिक तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी, 58 टक्के लोकांना अॅपमध्ये समस्या येत आहेत, 38 टक्के लॉगिन समस्यांना तोंड देत आहेत आणि 4 टक्के लोकांना वेबसाइटमध्ये समस्या आहेत. तरी आता व्हॉट्सअप पाठोपाठ इंस्टाग्रामही डाऊन झालं आहे का असा सवाल नेटकऱ्यांना पडला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)