Instagram Down: गेल्या काही महिन्यांत इंस्टाग्राम आणि फेसबुक डाऊन होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता आज रात्रीही सोशल साईट इंस्टाग्राम अचानक डाऊन झाली. इंस्टावर फीड रिफ्रेश केले जात नसल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. अनेकांनी याबाबत एक्सवर तक्रारी नोंदवल्या. एका 'एक्स' युजरने लिहिले की, ‘इंस्टाग्राम पुन्हा डाउन झाले आहे. त्यामुळे आता मी त्याचा तिरस्कार करतो.’ आणखी एका युजरने रागाने सांगितले की, ‘इंस्टाग्राम पुन्हा डाउन झाले आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘इन्स्टाग्राम आणि फेसबुक डाउन झाले आहेत. मला वाटते की मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गही आता मेल्टडाऊन झाले आहेत.’ आज व्हिडिओ स्ट्रीमिंग ॲप युट्यूब देखील दुपारी 1.30 ते 3.15 वाजेपर्यंत बंद झाले होते. (हेही वाचा: YouTube Down: मायक्रोसॉफ्टनंतर आता यूट्यूब डाऊन; यूजर्संना व्हिडिओ अपलोड करताना येत आहेत समस्या)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)