Indian AI Platform Hanooman: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करत आहे. आता भारतातील पहिला स्वदेशी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट लॉन्च करण्यात आला आहे. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट 98 जागतिक भाषांनाही सपोर्ट करेल. यामध्ये 12 भारतीय भाषांचाही समावेश आहे. ‘हनुमान’ नावाचा हा एआय चॅटबॉट सात आयआयटी, रिलायन्स, एसएमएल इंडिया आणि अबू धाबीच्या 3एआय होल्डिंग यांनी संयुक्तपणे विकसित केला आहे. हनुमान एआय चॅटबॉट इंग्रजी न जाणणाऱ्या वापरकर्त्यांना लक्षात घेऊन विकसित करण्यात आला आहे.

हा एआय चॅटबॉट हिंदीसह 11 प्रादेशिक भाषांना सपोर्ट करेल. ज्यामध्ये मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, ओडिया, पंजाबी, आसामी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि सिंधी यांचा समावेश आहे. अँड्रॉइड युजर्स गुगल प्ले स्टोअरवरून हनुमान एआय चॅटबॉट डाउनलोड करू शकतात. हा चॅटबॉट पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. तसेच, हा चॅटबॉट लवकरच iOS वापरकर्त्यांसाठी प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल. भारताने सुरू केलेले हा GenAI प्लॅटफॉर्म देशाच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विकासासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (हेही वाचा: मुलांच्या वाढत्या स्क्रीन टाइमबद्दल 89% भारतीय माता चिंतेत; अभ्यासाकडे दुर्लक्ष, मानसिक-शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)