Facebook-Instagram Down: आज संध्याकाळी म्हणजे 5 मार्च रोजी अचानक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम काम करणे बंद झाले. फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्हीवर कंटेंट लोड होत नाहीये. तसेच काही ठिकाणी हे दोन्ही प्लॅटफॉर्म सुरु होण्यासाठी युजर्सना अनेक अडचणी येत आहेत. अनेक युजर्सचे फेसबुक अकाउंट अचानक लॉग-आऊट झाले त्यानंतर पुन्हा लॉग-इन करतानाही अनेक समस्या भेडसावत आहेत. याबाबत वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी केल्या आहेत. फेसबुक प्लॅटफॉर्मला आउटेजचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे वापरकर्ते लॉग आउट झाले आहेत. आउटेजमुळे तुमचा पासवर्ड स्वीकारला जात नाही. या आउटेजचा परिणाम फेसबुक मेसेंजरवरही होत आहे. महत्वाचे म्हणजे फक्त भारतच नाही तर, जगभरातील लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. या घटनेनंतर फेसबुकची मूळ कंपनी मेटाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर #facebookdown ट्रेंडिंग सुरू झाले आहे. (हेही वाचा: YouTube Music Layoffs: चांगल्या वेतनाची मागणी करणे पडले महागात; कंपनीने युट्यूब म्युझिकच्या अनेक कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)