उत्तराखंड हायकोर्टाने फेसबुकला 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. यासोबतच मुख्य न्यायमूर्तींनी कंपनीला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. फेसबुकवर फेक आयडी तयार करून फोटो एडिट करून फसवणूक केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे. फेसबुकने निर्धारित वेळेत उत्तर दिले नव्हते, त्यामुळे आता कंपनीला दंड भरावा लागणार आहे. मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती आरसी खुल्बे यांच्या खंडपीठाने फेक आयडीद्वारे फोटो संपादित करून आणि अश्लील व्हिडिओ बनवून लोकांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी फेसबुकला 16 फेब्रुवारीपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

हरिद्वारचे रहिवासी आलोक कुमार यांनी स्वत:ला पीडित असल्याचा दावा करत, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. फेक आयडी बनवून फेसबुकवर लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या जात असल्याचे वकील अभिजय नेगी यांनी कोर्टाला सांगितले. फेसबुक रिक्वेस्ट मान्य केल्यानंतर त्यांचे फोटो एडिट करून अश्लील व्हिडिओ बनवले जात आहेत. त्याद्वारे त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे. आतापर्यंत 45 पीडितांनी अशा तक्रारी केल्या असून हे प्रकरण विचाराधीन आहे. याबाबत याचिकाकर्त्याचे वकील अभिजय नेगी यांनी सांगितले की, याआधीही न्यायालयाने फेसबुकला नोटीस दिली होती, मात्र अद्यापपर्यंत उत्तर दाखल करण्यात आलेले नाही. आता फेसबुक आयटी नियमांचे पालन करत नसल्याचे दिसते, असे निरीक्षण नोंदवत उत्तराखंड हायकोर्टाने जनहित याचिकांमध्ये वेळेत उत्तर न दिल्याने फेसबुकला 50 हजारांचा दंड ठोठावला आहे.

'It Appears Facebook Is Not Complying With IT Rules': Uttarakhand High Court Imposes ₹50K Costs On FB For Not Filing Reply In PIL https://t.co/Qc71BqZ882

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)