आता ट्विटरच्या माध्यमातून ट्वीट लेखकांना कमाईची संधी मिळणार आहे. Twitter Inc. ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी लवकरच ट्विटच्या प्रत्युत्तरांमध्ये (Replies) जाहिराती दाखवण्यास सुरुवात करणार आहे. यासह ट्विटच्या लेखकासोबत यातील काही महसूलदेखील शेअर केला जाणार आहे. मालक एलोन मस्क याला दुजोरा दिला आहे.

ट्विटरच्या माध्यमातून कमाईचा वाटा मिळविण्यासाठी पात्र होण्यासाठी, युजर्स ट्विटर ब्लू (Twitter Blue) नावाच्या प्रीमियम आवृत्तीचे सदस्य असणे आवश्यक आहे. यासाठी महिन्याला $8 आकालारे जात आहेत. मस्क यांनी सांगितले की, हा कार्यक्रम आज सुरू होईल. सध्या तरी ही योजना कशी काम करेल याबाबत फार कमी तपशील शेअर केले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)