Name And Gender Change: वित्त मंत्रालयाने वरिष्ठ भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकाऱ्याला अधिकृतपणे तिचे नाव आणि लिंग बदल करण्याची परवानगी दिली आहे. याबाबत मूळ महिला अधिकाऱ्याने केंद्राला विनंती केली होती. अहवालानुसार, सुश्री एम अनुसूया यांनी मंत्रालयाकडे एक याचिका सादर केली होती, ज्यामध्ये त्यांनी आपले नाव नाव एम अनुकाथिर सूर्या आणि लिंग स्त्रीवरून पुरुष असे बदलण्यास सरकारच्या मंजुरीची विनंती केली होती. ही विनंती मान्य करण्यात आली आहे. अशा प्रकारे हैदराबादमध्ये तैनात भारतीय महसूल सेवेतील एक महिला अधिकारी लिंग व नाव बदल करून पुरुष बनला आहे. यासोबतच आतापासून सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये त्यांचे नाव अनुकथिर सूर्या एम असे असेल. (हेही वाचा: Kidney Scam in Andhra Pradesh: कर्ज फेडण्यासाठी विकली किडनी; 30 लाखाऐवजी मिळाले अवघे 50 हजार, गुंटूर येथील ऑटो-रिक्षा चालकाची फसवणूक)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)