IND vs PAK SAFF Championship 2023: सॅफ चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने शानदार सुरुवात केली आहे. सुनील छेत्रीच्या हॅट्ट्रिकमुळे भारताने पाकिस्तानचा 4-0 ने पराभव (India Beat Pakistan) केला. सुनील छेत्रीने 10व्या, 16व्या आणि 72व्या मिनिटाला गोल केले. 80 व्या मिनिटाला उदांता कुमामने गोल केला. सुनील छेत्रीने पूर्वार्धात दोन गोल केल्यानंतर भारताने 2-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमाक यांचे पाकिस्तानी खेळाडूंशी भांडण झाले. दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. दुसऱ्या हाफमध्ये सुनील छेत्रीने पेनल्टीवर गोल केला आणि त्यानंतर 80व्या मिनिटाला उदांताने गोल करत संघाची आघाडी 4-0 अशी नेली. (हे देखील वाचा: IND vs PAK SAFF Championship 2023: फुटबाॅल सामन्यादरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये झाली हाणामारी, पहा व्हिडिओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)