मुंबई: मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी टीम इंडियाला (Team India) राज्य सरकारकडून 11 कोटींचं बक्षिस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. विधान भवनाच्या सेंट्र्ल हॉलमध्ये मुंबईच्या रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी 11 कोटींच्या बक्षिसाची मोठी घोषणा केली. या सगळ्या संभारात देवेंद्र फडणवीसाने (Devendra Fadnavis) आपले मनोगत व्यक्त केले आणि भारतीय संघाचे, रोहि शर्माचे कोतुक केले. यादरम्यान ते म्हणाले, आता मुंबईला वानखेडे स्टेडियमपेक्षाही मोठ्या स्टेडियमची गरज आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय या सगळ्यांना जी मदत लागेल ती मदत त्यांना आम्ही करु. येत्या काळात मुंबईमध्ये 1 लाख लोकं मावतील असं स्टेडियम करण्यात यावं, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)