आयपीएलच्या 16व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले तर मुंबई इंडियन्सच्या संघात 2 बदल करण्यात आले आहेत. वेगवान गोलंदाज रिले मेरेडिथला संधी मिळाली आहे. ट्रिस्टन स्टब्सला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
त्याचबरोबर टीम डेव्हिडच्या जागी नेहल वढेराला संघात स्थान देण्यात आले आहे. दिल्ली संघातही दोन बदल करण्यात आले आहेत. यश धुलला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. खलील अहमदला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले आहे. रिले रुसोच्या जागी मुस्तफिजुर रहमानला संधी मिळाली आहे. हेही वाचा IPL 2023: कुटुंब कर्जात बुडाले होते, पण आता संघर्षाचे दिवस संपले आहेत, KKR स्टार रिंकू सिंगची प्रतिक्रिया
🚨 Toss Update 🚨@mipaltan win the toss and elect to field first against @DelhiCapitals.
Follow the match ▶️ https://t.co/6PWNXA2Lk6 #TATAIPL | #DCvMI pic.twitter.com/ow1NTZ2Gsx
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)