India Win Gold Medal in Women's Team Event at Chess Olympiad 2024: चेस ऑलिम्पियाड 2024 या स्पर्धेत भारताच्या महिला संघाने देखील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. चेस ऑलम्पियाड 2024 (Chess Olympiad 2024)स्पर्धेत भारताच्या महिला संघाने देखील सुवर्ण पदक जिंकले आहे. महिलांच्या संघात वंतिका अगरवाल, दिव्या देशमुख, हरिका द्रौनोवल्ली, वैशाली रमेशबाबू, तानिया सचदेव या खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिला या भारताच्या दोन्ही संघाने सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय महिला संघाचा अझरबैजानविरुद्ध शेवटचा सामना झाला. (हेही वाचा: Chess Olympiad 2024: चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने इतिहासात पहिल्यांदाच जिंकले सुवर्णपदक; डी गुकेशची चमकदार कामगिरी)

महिला संघाने जिंकले सुवर्णपदक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)